Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५० टक्क्यांच्या आतच अडकून पडला होता त्याने अखेर टक्केवारीत पन्नाशी पार केली. त्यामुळे मुंबईला होणाऱ्या वर्षभराच्या एकूण पाणी पुरवठ्याच्या तुलनेत शनिवार दिनांक १८जुलै पर्यंत ५०.७७ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये सेंटीमीटरमध्ये पाण्याचा पातळी वाढत असतानाच शुक्रवार ते शनिवारी या २४ तासांमध्ये एक टक्क्याने पाण्याची पातळी वाढली आहे. शुक्रवारी या सर्व धरणांमध्ये एकूण ४९.७८ टक्के एवढा पाणी साठा होता आणि बुधवार ०८ जुलैपासून या सर्व धरणांमधील पाणी ४९ टक्क्यांच्या आतच रेंगाळत होता. (Mumbai's water stock)



मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमध्ये मुंबईकरांच्या वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा अपेक्षित मानला जातो. पण शनिवारी सकाळी घेतलेल्या नेांदीनुसार या सर्व धरणांमधील पाणी साठा हा ५०.७७ टक्के अर्थात ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. यापूर्वी ६ जुलै २०२६ रोजी विहार आणि तुळशी तलाव ओसंडून भरु वाहूल लागले होते. त्यामुळे हे दोन्ही तलाव भरले असले तरी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये केवळ ४५ टक्केच पाणी साठा आहे. तर मध्य वैतरणामध्ये ४५ टक्के, तानसा धरणामध्ये ८० टक्के, मोडक सागरमध्ये ७७ टक्के आणि अप्पर वैतरणा धरणात ३० टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे. तानसा धरणामध्ये ८० टक्के पाणी साठा जमा झाला असला तरी हे तलाव ओसंडून वाहण्यासाठी दीड मीटरचे अंतर आहे. (BMC News)



या सर्व धरणांमध्ये १८ जुलै २०२६ रोजी ५०.७७ टक्के एवढा पाणी साठा असला तरी याच तारखेला मागील वर्षी ८१.४७ टक्के एवढा पाणी साठा होता आणि त्या आधीच्या वर्षी म्हणजे सन २०२४मध्ये ३८.४७ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे मागील वर्षी पेक्षा पाणी साठा कमी असला तरी त्या आधीच्या म्हणजे सन १८ जुलै २०२४च्या तुलनेत हा पाणी साठा अधिक आहे.


१८ जुलै ची मागील तीन वर्षांतील स्थिती


सन २०२६ : ० ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर (५०.७७ टक्के)

सन २०२५ : ११ लाख ७९ हजार १४७ दशलक्ष लिटर ( ८१.४७ टक्के)

सन २०२४ : ०५लाख ५६ हजार ७८२ दशलक्ष लिटर (३८.४७ टक्के)
Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.