Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात विविध नाले आणि खाड्यांमधून वाहून आलेला कचरा कचरा हा समुद्र किनाऱ्यांवर जमा झाला असून यापैंकी एक असलेल्या जुहु किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यामुळे माध्यमातून मोठ्याप्रमाणात टिका झाल्यानंतर महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) विशेष मोहिम राबवून येथील कचरा हटवून समुद्र किनारपट्टीची स्वच्छता केली. परंतु ही परिस्थिती यापूर्वीच्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्याने निर्माण झाली होती. परंतु आता याठिकाणी नव्याने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जुहू चौपाटीची स्वच्छता करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Juhu Beach)


सद्यस्थितीत जुहू समुद्र किनारपट्टीची स्वच्छता करण्याकरिता लागणारे मनुष्यबळ के/पश्चिम विभागाच्या घनकचर व्यवस्थापन खात्यामार्फत पुरविण्यात येते. तसेच जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याकरिता लागणारी यंत्रसामग्री जसे की ट्रॅक्टर ट्रॉली, बीच क्लिनिंग मशिन, स्कीड लोडर मशिन घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या नियोजन विभागामार्फत पुरविण्यात येते. मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरुन गोळा केलेला कचरा उचलून देवनार डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याकरिता डंपर्स आणि जेसीबी मशिन या खासगी संस्थेमार्फत भाडेतत्वावर पुरविण्यात येतात. सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर सध्या दररोज जवळपास ३५० मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर वाहून येत आहे. या कामाच्या निविदेचा कंत्राट कालावधी ०४ जून २०२६ रोजी रोजी संपुष्टात आलेला आहे. (Mumbai beach)



जुहू समुद्रकिना-यावरील डंपर्स आणि जेसीबीची आवश्यकता असून


कंत्राटदाराने या समुद्रकिना-यावरुन काढलेले साहित्य उचलून देवनार डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याकरिता डंपर्स आणि जेसीबीचची आवश्यक होती. त्यामुळे पुढील दीड वर्षांच्या कालावधीसाठी किंवा जेसीबीच्या १०९० पाळ्या आणि डंपरच्या ३८७६ फेऱ्या या संपुष्टात येईपर्यंत यापैकी जे काही नंतर असेल त्याप्रमाणे निविदा मागवली होती. (BMC)


या निविदेमध्ये दीपक ऍन्ड सन्स ट्रान्सकॉन एलएलपी ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला १८ महिन्यांच्या कालावधीसाठी २.४२ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जुहु चौपाटीच्या कामांसाठी या कामांसाठी ज्या कंपनीची निवड करण्यात आली होती त्या कंपनीच्या तुलनेत या नवीन कंपनीने २४ टक्के कमी दर प्रत्येक पाळींमध्ये देवू केला आहे.



दहा दिवसांमध्ये १८०० मेट्रीक टन कचरा हटवला


महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरून दररोज सुमारे १८० मेट्रिक टन कचरा (Waste management) हटविण्यात येत आहे. मागील दहा दिवसात सुमारे १ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. ही स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करून जुहू समुद्र किनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक आमदार अमित साटम यांनी विशेष लक्ष घातले आहे


जुहू समुद्रकिना-याची स्वच्छता करण्याकरिता यंत्रसामग्री भाडेतत्वावर पुरविणे


-जेसीबी १०९०पाळ्या व डंपर्स ३८७६ फेऱ्या


-पावसाळयादरम्यान चार डंपर्स व एक जेसाबी प्रतिपाळी याप्रमाणे प्रतिदिन दोन पाळ्या


-पावसाळासोडून इतर कालावधीत तीन डंपर्स व एक जेसाबी प्रतिपाळी याप्रमाणे प्रतिदिन दोन पाळ्या


-कंत्राट कालावधी १८ महिने किंवा नियोजित सेवा संपेपर्यंत

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.