"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यावर्षीही मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल दोन विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. त्यामधील एक ट्रेन आज मंत्री नितेश राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती सुटली असून उद्या रविवारी देखील ट्रेन सोडण्यात येणार आहे.


पुढच्या आठवड्यात प्रत्येकाच्याच घराघरात आणि मंडळात गपणतीचे आगमन होणार आहे.त्यामुळे आतापासूनच कोकणकरांनी आपआपली गावं गाठायला सूरूवात केली आहे.
विशेष बाब म्हणजे या प्रवासात प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवणाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. कोकणवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या उपक्रमाचे हे १३वे वर्ष असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज झाली आहेत.


अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी ही 'मोदी एक्स्प्रेस' कोकणवासीयांसाठी एक पर्वणी ठरली आहे. "या 'डबल धमाका' विशेष मोदी एक्स्प्रेसचा सर्व कोकणवासीयांनी लाभ घ्यावा आणि आपला गणेशोत्सवाचा प्रवास सुखाचा करावा," असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.


या उपक्रमामुळे सणांच्या दिवसात होणारी गर्दी आणि खासगी वाहतुकीचा खर्च टाळून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.


रेल्वे प्रशासनाकडूनही अनेक जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र अनेक रेल्वे गाड्यांचे बुकिंग आधीच फूल्ल झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील राणे कुटुंबीयांकडून मुंबईतून थेट गावी जाण्यासाठी स्पेशल दोन रेल्वे गाड्या सोडल्या गेल्या आहेत.


नुकतीच या दोन्ही मोदी एक्सप्रेस गाड्यांची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली होती. या उपक्रमाचे हे १३वे वर्ष आहे. गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून, 11 ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले आहेत.

Comments
Add Comment

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे