‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड गाजत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफाट यश मिळवल्यानंतर आता रजनीकांत त्यांच्या ब्लॉकबस्टर प्रोजेक्ट ‘जेलर’च्या सिक्वल म्हणजेच 'जेलर २' मध्ये दिसणार आहेत.


या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा नेल्सन दिलीपकुमार करणार आहेत. प्रेक्षकांमध्ये आधीच या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती आणि आता यात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या दमदार एंट्रीमुळे ही उत्सुकता अजूनच वाढली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना 'जेलर २' मध्ये अतिशय महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले असून ते लवकरच रजनीकांतसोबत शूटिंग सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे, रजनीकांत आणि मिथुन यांची जोडी यापूर्वीही झळकली आहे. त्यांनी हिंदी चित्रपट ‘भ्रष्टाचार’(१९८९) आणि बंगाली चित्रपट ‘भाग्य देवता’ (१९९७) मध्ये एकत्र काम केले होते.


पहिला भाग ‘जेलर’ १० ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्याने जगभरात तब्बल ६५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात मोहनलाल, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन आणि वसंत रवी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या.

Comments
Add Comment

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने सांगितला 'तो' भयानक किस्सा...

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण

प्रसिद्ध युट्युबरचा देश सोडून जाण्याचा निर्णय, कारण आले समोर?

मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश

बॉलिवूडची ग्लॅम नायिका दीपिकाने अखेर आठ तासांच्या ड्युटीबद्दल सोडले मौन!

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई

गणिताचे महत्त्व

करिअर : सुरेश वांदिले गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र