रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत मुलींची नावे मंगला मनोहर वाघे (१५) व सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी आहेत.


स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या मागील जंगलात शेळ्या चारायला गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या परत आल्या व शेळ्या गोठ्यात बांधल्या. थोड्याच वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना गोठ्याजवळ पडलेल्या अवस्थेत पाहिले.


त्या बेशुद्ध होत्या, धाप लागत होती आणि प्रकृती गंभीर होती. तिने तत्काळ आरडाओरड केली, त्यानंतर गावकरी धावत आले. घरच्यांनी त्यांना आत नेईपर्यंत दोघींनीही प्राण सोडले होते. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत पाटील यांनी पथकासह धाव घेतली व तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


दोन्ही बहिणींचे मृतदेह दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण तपासून पाहिले जाणार आहे. पोलीस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करीत असून पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व