मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा गणेशोत्सव काळात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ७ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, तर २५ आणि २६ ऑगस्ट रोजी कोकणात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील ५ दिवसांत गुजरात किनाऱ्यावर जोरदार वारे (४०-५० किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरातसह उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालजवळ एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्टपासून पूर्व भारत आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
सोबतच पुढील ७ दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ आणि २७ ऑगस्ट रोजी विदर्भ, २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, २२ ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी झारखंड, बिहार, तसेच २५ आणि २६ ऑगस्ट रोजी ओडिशा आणि २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२६ आणि २७ ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत भागात, केरळच्या किनारपट्टीवर आणि २५ आणि २६ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तेलंगणात अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.