बिहार विधानसभा निवडणूक: मतदार यादीतील नावांसाठी आधार कार्ड आता वैध

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेसाठी आता आधार कार्डलाही वैध ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मोठा धक्का बसला आहे. याआधी निवडणूक आयोगाने आधार कार्डला या प्रक्रियेतून वगळले होते, ज्याला ‘इंडिया’ आघाडीने विरोध दर्शवला होता.


निवडणूक आयोगाने बिहारमध्ये १ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती, ज्यातून सुमारे ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. ही नावे मृत किंवा दोन ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या मतदारांची असल्याचे आयोगाने सांगितले होते. या प्रक्रियेत मतदारांची पडताळणी करण्यासाठी पॅन कार्ड, गुणपत्रिका यांसारखी ११ कागदपत्रे ग्राह्य धरली जात होती. मात्र, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र या यादीतून वगळल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.



यावर, अधिवक्ता बरुण सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचा स्थिती अहवाल सादर केला. न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या ‘बीएलओ’ (BLO - Booth Level Officer) यांना निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून मतदार यादीचे पुनरावलोकन लवकरात लवकर पूर्ण होईल.


नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ वैध मतदारच मतदान करू शकतील यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता आधार कार्डचा वापर करून मतदार यादीतील नावे पुन्हा तपासणे सोपे होईल, असे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे

फिजिओथेरपिस्टना 'डॉक्टर' उपाधी लावण्यास मनाई, आरोग्य सेवा महासंचालनालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : आरोग्य सेवा महासंचालनालय यांनी फिजिओथेरपिस्टसाठी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. आरोग्य सेवा

छत्तीसगड : गरियाबंदमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि

Vice President : राधाकृष्णन शुक्रवारी घेणार उपराष्ट्रपती पदाची शपथ

नवी दिल्ली : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. (चंद्रपुरम पोन्नुसामी) राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ शुक्रवार, १२

भारताचा अमेरिकेला दणका, मॉरिशससोबत स्थानिक चलनात होणार व्यापार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रामुख्याने तेलाशी संबंधित व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत होता. पण भारताने