राज्यात आजपासून काही भागात पावसाचा जोर ओसरणार

काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज गुरुवारी काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, राज्यात काही भागात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जनजीवन विस्कळित झाले. राज्यातील बहुतांश भागात मात्र, बुधवारी पावसाचा जोर कमी होता. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पाऊस ओसरला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.


त्यानुसार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. प्रामुख्याने कोकणात अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल. मात्र, इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला, पहाटेही पावसाचा जोर कायम होता.


सकाळी ११ नंतर पावसाने विश्रांती घेतली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ०.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९.८ मिमी पावसाची नोंद झाली.


राज्यात बुधवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत झालेला पाऊस


पुणे – १.८ मिमी


माथेरान – २९.४ मिमी


नाशिक – २२.२ मिमी


कोल्हापूर – ४.३ मिमी


धाराशिव – ४.२ मिमी


डहाणू – २७.२ मिमी


रत्नागिरी – ७.३ मिमी


मालेगाव – १९.३ मिमी


पावसाचा अंदाज कुठे


मुसळधार पाऊस – मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड
हलक्या सरी – सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली,परभणी, बीड, हिंगोली, नांदेड यवतमाळ, चंद्रपूर, लातूर

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व