पुढील ३ तास धोक्याचे! मुंबईकरांना सतर्क राहण्याचे थेट मंत्रालयातून आदेश

मुंबई: पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याद्वारे देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे मंत्रालयातून आवाहन करण्यात आले आहे.


मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज दुपारी २ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत समुद्राला भरती असल्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या दरम्यान मुंबईत आणखीन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यामुळे मुंबईच्या सखल भागात आणखीन पाणी साचू शकते. त्यामुळे मुंबईत काही तास पुरपरिस्थितीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे, समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे, तसेच नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे राज्यातील पावसाचा आढावा घेत ट्विट केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की,  "मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची ३.९ मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून ३५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत."



ठाण्यात दरड कोसळली, एक जखमी


ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील संतोष पाटील नगर येथे असलेल्या घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.



मुंबईची जीवनवाहिनी ठप्प


मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक देखील काही कालावधीसाठी ठप्प झाली आहे.


मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे, ज्याचा चांगलाच फटका ग्रामीण आणि शहरी भागाला बसला आहे. मुंबई, कोकण,  पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी अनेक भागात रेड अलर्ट जारी केलाय, तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्टही जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पाच जण वाहून गेले आहेत. आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याचे सांगण्यात आले आहे.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत