मुंबई: मुंबईतील मोनोरेल सेवेत आज काही प्रमाणात बिघाड झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ एका मोनोरेल गाडीत किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोनोरेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वीज पुरवठ्यामध्ये (power supply) काही समस्या निर्माण झाली होती. प्रशासनाचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.
विरार: वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या लोकल ...
सध्या वडाळा ते चेंबूर दरम्यानची मोनोरेल सेवा एकाच मार्गावर सुरळीत सुरू आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून, प्रवाशांची सुरक्षा ही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.