मध्य रेल्वे ठप्प, सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली


मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये नागरिकांच्या कमरेइतकं पाणी भरल्याने चालताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील टप्प झाली आहे. सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे या भागात लोकल सेवेत खोळंबा दिसून येतो आहे.


मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रचंड पाऊस आणि भरती सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने फ्लड गेट्स उघडले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी मुंबईत शिरण्यापासून रोखले जात आहे. सध्या हे फ्लड गेट बंद करण्यात आले आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर यासह मिठी नदीच्या जवळ असलेल्या परिसरांमध्ये पाणी साचले आहे. दादरसारख्या स्टेशनमध्येही पाणी भरल्याने लोकल सेवेला प्रत्यक्ष फटका बसला आहे.


सध्या सायन आणि दादर दरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत, पण पाण्याची पातळी ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर पाणी सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि प्रवाशांना अद्याप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


Comments
Add Comment

हिंजवडीत भीषण अपघात; २० वर्षीय तरुणीचा डंपरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी झालेल्या एका भीषण अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेतील

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण