दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

  42

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले तुडुंब भरल्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर आलं असून, नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः दापोली एसबीआय बँकेसमोरच्या परिसरात पाणी साचले असून, रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनचालकांची कसरत होत आहे. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी पाण्यात अडखळल्याची दृश्ये पाहायला मिळत आहेत.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील लक्ष्मीनारायण मंदिर ते कर्दे याजवळ रस्त्यावरील जवळजवळ वीस ते पंचवीस घरांचा संपर्क तुटला आहे.नागरिकांनी पावसाचा इशारा व आज देण्यात आलेला रेड अलर्ट लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे, तसेच आपल्या भागात परिसरात पाणी भरल्यास कोणतीही मदत लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत गावातील पोलीस पाटील, तलाठी, सर्कल यांना संपर्क करावा असा आवाहन दापोली तहसीलदार यांनी केल आहे. दापोलीमधील बुरोंडी गावात पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे घरांमध्ये पाणी शिरला असून मदतीची मागणी केलीय.

दापोली प्रशासन आणि बुरोंडी ग्रामपंचायतकडे मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे.दाभोळ दापोलीमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दाभोळ-दापोली मार्गावरील मुख्य रस्त्यावरील नानटे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मुख्य रस्ता बंद असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे रस्ता तात्पुरता बंद आहे. तसेच, दापोली तहसीलदार कार्यालयाच्या आसपासच्या परिसरात देखील पाणी साचल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दापोली आणि खेड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली आणि खेड रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता तात्पुरता बंद केला आहे.पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनचालक आणि प्रवाशांनी या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले असून, आपत्कालीन सेवा आणि प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या

दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे

चिपळूण, खेड, दापोलीत मुसळधार पाऊस, पाहा कोकणातील पावसाचे अपडेट

गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे,

किनारपट्टीला ‘एरिन’ चक्रीवादळाचा धोका, हवामान विभागाचा अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाका दिलाय. अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ आता वेगाने

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.