Airtel Down: एअरटेल सेवा बंद! कॉल आणि इंटरनेट सेवेवरही परिणाम

मुंबई: एअरटेल डाउन डिटेक्टरनुसार देशभरातील एअरटेल ग्राहकांना गेल्या काही तासांपासून नेटवर्क आणि इंटरनेट समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यांमध्ये  मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद, बंगळुरू,  कोलकाता आणि जयपूर तसेच कानपूर या शहरांतील एअरटेल वापरकर्त्यांना गेल्या काही तासांपासून मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटशी संबंधित समस्या येत आहेत. याबाबत स्वतः एअरटेलने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की ते शक्य तितक्या लवकर ही समस्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.


अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की त्यांच्या मोबाइलवर नेटवर्क सिग्नल दिसत आहे, परंतु कॉलिंग पूर्णपणे बंद आहेत. कॉल करता येत नाही किंवा आलेला कॉल उचलता स्वीकारता देखील येत नाही.  या सर्व तक्रारी सोशल मीडियावर एअरटेलविरुद्ध दिसून आल्या. बहुतेक तक्रारी दिल्ली एनसीआर तसेच मुंबईमधील वापरकर्त्यांनी केलेल्या दिसून येत आहेत.



नेटवर्क खंडित होत असल्याची एअरटेलने केली पुष्टी


मोबाइल इंटरनेट बंद झाल्यामुळे, सोशल मीडिया वापरणाऱ्या वापरकर्त्यांना, ऑनलाइन पेमेंट आणि इतर डिजिटल सेवा वापरताना देखील समस्या निर्माण झाल्या आहेत. एअरटेलने सोशल मीडियावर या खंडित सेवेची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. तसेच तांत्रिक टीम समस्या सोडवत असल्याचे कंपनीने निवेदनात म्हंटले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल माफी देखील  मागितली असून लवकरच सेवा सामान्य केली जाईल असे आश्वासन देखील दिले आहे.



३५०० हून अधिक तक्रारी


डाउन डिटेक्टरनुसार, दिल्ली-एनसीआर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील एअरटेल ग्राहकांना सध्या नेटवर्क आणि इंटरनेट समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) दुपारी ४:३० वाजेपर्यंत सेवा खंडित झाल्याच्या ३,५०० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. यापैकी ६८ टक्के वापरकर्त्यांनी फोन कॉलबद्दल तक्रार केली. १६ टक्के लोकांनी मोबाईल इंटरनेटबद्दल तक्रार केली तर १५ टक्के लोकांनी सिग्नल न मिळाल्याबद्दल तक्रार केली. ५ जी प्लॅन असूनही ४ जी नेटवर्कवरील डेटा कपातीबद्दल अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे. अनेक लोकांनी सांगितले की, शहरी भागात राहूनही जिथे कव्हरेज सामान्यपेक्षा स्थिर आहे, त्यांना कमकुवत नेटवर्कचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद