हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मेन रोडला जोडणारा असून कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. तसेच मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचविण्यात आली होती. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याठिकाणी जाऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपासरपंच, तसेच सदस्य व गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली आहे.याबाबत ज़िल्हापरिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असून याघटनेची माहिती घेतली जाईल व सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपयोजना करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.