मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर


मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा उचलण्यासाठी छोट्या कॉम्पॅक्टर वाहनांची वाहतूक करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता महापालिकेच्यावतीने आता ई गाडीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयाच्यावतीने वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील अरुंदी गल्लीतील कचरा उचलण्यासाठी विशेष ई कचरा गाडीचा प्रयोग केला असून १५ ऑगस्ट दिनी प्रायोगिक तत्त्वावर याचा प्रारंभ करण्यात आला आहे.


एच/पूर्व विभागातील अरुंद झोपडपट्टीतील गल्लींमध्ये कचरा संकलनातील अडचणी दूर करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रयत्न केला जात असून यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-गाडीचा प्रारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ई गाडीचा प्रयोग करण्यात येत असून अंडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करून प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू करण्यात आला आहे.


या ई गाडीचा वापर करण्याची ही संकल्पना कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवून विभागाचा स्वच्छ व हिरवागार परिसर या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यास मदत करेल,असा विश्वास मृदुला अंडे यांनी व्यक्त केला.


वाहनाची रुंदी ३२ इंच-अशा अरुंद गल्लींमध्ये सहज प्रवेश, जिथे लहान बंदिस्त कचरा गाड्या पोहोचू शकत नाहीत.
वाहन क्षमता : २२० किलो कचरा किंवा बांधकाम मलबा वाहून नेण्याची क्षमता.
कार्यक्षमता : ४ मजूरांच्या कामाएवढी कार्यक्षमता या वाहनाची आहे.
वाहन बॅटरीवर चालणारे : एका चार्जमध्ये ६० किमी अंतर पार करण्याची क्षमता.
वाहनाला जोडलेले डब्बे : ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बे.
वाहनातील हायड्रॉलिक अनलोडिंग प्रणाली : कचरा किंवा मलबा सहजतेने खाली करण्याची सुविधा.
बहुउपयोगी वापर : डंपर किंवा मलबा गाड्या न पोहोचू शकणाऱ्या गल्लींमधून मलबा काढण्यासाठीही

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन