नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषद नेमकी कोणत्या मुद्यांवर होईल, याबाबत मात्र आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या मतदार याद्यांमधील गैरव्यवहारवर विरोधी पक्षांकडून विशेषत: राहुल गांधी आणि काँग्रेसकडून आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून उद्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांकडून दिली जात आहे.
राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील काही ...
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी म्हटले होते की, आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून मतदार यादीतील फेरफार आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधींनी ट्विटर आणि पत्रकार परिषदांमधून थेट टीका करत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत निवडणुकीची तयारी, पारदर्शकतेसाठी उचललेली पावले आणि राहुल गांधींसह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले जाऊ शकते.