बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे विमान मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर  लँडिंग करतेवेळी अचानक अनियंत्रित झालं होते. या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला, मात्र यामुळे कोणताही मोठा अपघात झाला नाही.


समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या A321 विमान लँडिंगदरम्यान डगमगले, या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळल्याचे दिसून आले. इंडिगोने याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, खराब हवामानामुळे पायलटने लँडिंगऐवजी पुन्हा टेकऑफचा निर्णय घेतला, त्यामुळे विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नुकसान टळले, आणि प्रवासी देखील सुखरूप राहिले.



खराब हवामानामुळे घडली ही घटना


इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, “१६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत खराब हवामान होते. त्यामुळे कमी उंचीवर उड्डाण करत असताना इंडिगो एअरबस ए३२१ या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. मात्र विमानाने पुन्हा उड्डाण घेतले आणि ते सुरक्षितपणे उतरले. आता हे विमान पुन्हा सेवेत उतरवण्यासाठी आवश्यक तपासणी, दुरुस्ती आणि मंजुरी घ्यावी लागणार आहे.’


इंडिगोने निवेदनात पुढे असे देखील म्हटलं आहे की, ‘प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा इंडिगोचे पहिले प्राधान्य आहे. या घटनेनंतर विमान ग्राउंड करण्यात आले असून डीजीसीएला त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.'


डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आम्ही या घटनेची चौकशी करू. हे विमान 6E 1060 होते, जे बँकॉकहून मुंबईला येत होते. शनिवारी पहाटे 3:06 वाजता धावपट्टी 27 वर उतरत असताना हा किरकोळ अपघात झाला. खराब हवामानामुळे ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.



मुंबईत मुसळधार पाऊस


मुंबईत काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याकारणांमुळे मुंबईत अनेक काही दिवस पाऊसाचेच वातावरण असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बँकॉकवरुन येणाऱ्या ए३२१ इंडिगो विमानाला धावपट्टीवर उतरताना या खराब हवामानाचा सामना करावा लागला होता.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत