Friday, August 15, 2025

शमिता शेट्टीने केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

शमिता शेट्टीने केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

मुंबई: आज संपूर्ण देशात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहेत. या खास प्रसंगी भारतात प्रत्येक ठिकाणी १५ ऑगस्ट निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आणि ध्वजारोहण केले जात आहे. यादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटी देखील स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिसले. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो त्यांनी सोशल मिडियावर देखील शेयर केले आहेत. मात्र यादरम्या अभिनेत्री शमिता शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तिने असे काही केले आहे की, ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या रडारवर आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया. 

 
 
View this post on Instagram
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने त्यांचे कुटुंबीय आणि सोसायटीतील लोकांसोबत आज स्वातंत्र्यदिन साजरा केला. यादरम्यान शमिता शेट्टी देखील त्यांच्यासोबत दिसली. स्वातंत्र्यदिन साजरा करतानाचा राज कुंद्रा आणि शमिता यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही राष्ट्रगीताच्या वेळी एकत्र उभे असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राष्ट्रगीताच्या वेळी राज कुंदरा सरळ उभे राहून देशभक्तीत मग्न असल्याचे दिसून आले, मात्र दुसरीकडे शमिता कोणत्याही नियमांचे पालन करत नव्हती. राष्ट्रगीताच्या वेळी ती हालचाल करताना दिसली.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शमिताला युजर्सने प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकाने म्हटले आहे की, शमिताला राष्ट्रगीताच्या वेळी कसे उभे राहायचे हे माहित नाही. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की थोडी लाज बाळग. तर अनेक युजर्सनी "शमिताला कोणीतरी राष्ट्रगीताला कसे उभे राहायचे ते सांगावे." असे लिहिले.  त्याच वेळी, अनेकांनी तिच्या डाएट, फिटनेस आणि शिष्टाचाराचीही खिल्ली उडवली. स्वातंत्र्यदिनी ट्रोल होणारी शमिता ही पहिली सेलिब्रिटी नाहीये. तिच्या आधीही अनेक स्टार्सना एका छोट्याशा चुकीमुळे ट्रोल करण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा