मुंबई: बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र यांच्यां प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची मुलगी ईशा देओलने दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र काल रात्रीपासून धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे सिनेसृष्टीतही चिंतेचे वातावरण दिसत होते. मात्र आता ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. अनेकांनी श्रद्धांजली पोस्टसुद्धा शेअर केल्या होत्या. पण आता कुटुंबाने स्पष्ट केले की, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे आणि ते लवकरच पूर्ण बरे होतील. धर्मेंद्र यांचे चाहते देशभर असल्याने सर्वांना दु:ख झाले होते. मात्र आता ईशा देओलच्या अपडेटनंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





