‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सैन्याच्या शौर्याची प्रशंसा


नवी दिल्ली : या वर्षी आपल्याला दहशतवादाचे दुःख सहन करावे लागले. पहलगाम हल्ला भ्याड आणि अमानवी होता. त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आत्मनिर्भर भारत मिशनची चाचणी घेण्याची ही एक संधी होती. सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.


७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. २४ मिनिटांच्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर, काश्मीर रेल्वे प्रकल्प, विकास, लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांसारख्या विषयांवर भाष्य केले.


राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, काश्मीर खोऱ्यात रेल्वे सेवा सुरू करणे ही एक मोठी कामगिरी आहे. यामुळे त्या भागात व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल. आयुष्मान योजनेचा ५५ कोटी लोकांना फायदा झाला आहे. भारत लोकशाहीची जननी आहे, संविधान आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्या संविधानात चार मूल्यांचा उल्लेख आहे, जे आपल्या लोकशाहीला मजबूत ठेवणारे चार आधारस्तंभ आहेत.


ही मूल्ये म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. या सर्व मूल्यांमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठेची संकल्पना आहे. आपण आपल्या लोकशाहीवर आधारित संस्था निर्माण केल्या, ज्यामुळे लोकशाहीचे कामकाज बळकट झाले. आपले संविधान आणि लोकशाही आपल्यासाठी सर्वोपरी आहे. आपण फाळणीचे दुःख कधीही विसरू नये. आज आपण फाळणीचा भयानक स्मृतिदिन साजरा केला. फाळणीत भयानक हिंसाचार झाला आणि लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. आज आपण इतिहासाच्या चुकांचे बळी ठरलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. भारताने ७८ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी भारताने बलिदानाच्या बळावर स्वातंत्र्य मिळवले असल्याचे त्या म्हणाल्या.


राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, स्वातंत्र्य परत मिळवल्यानंतर, आपण अशा मार्गावर निघालो जिथे सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार होता. दुसऱ्या शब्दांत, आपण स्वतःला आपले नशीब घडवण्याचा अधिकार दिला. अनेक लोकशाही व्यवस्थांमध्ये, लिंग, धर्म आणि इतर कारणांवरून लोकांना मतदान करण्यावर निर्बंध होते; परंतु आपण ते केले नाही. आव्हाने असूनही, भारतीयांनी लोकशाही यशस्वीरीत्या स्वीकारली. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सामूहिक स्मृतीत कोरला गेला आहे.


१५ ऑगस्ट ही तारीख आपल्या सामूहिक स्मृतीत खोलवर कोरली गेली आहे. वसाहतवादी राजवटीच्या दीर्घ काळात, देशवासीयांच्या अनेक पिढ्यांनी स्वप्न पाहिले, की एक दिवस देश स्वतंत्र होईल. देशाच्या प्रत्येक भागात राहणारे लोक परकीय राजवटीच्या बेड्या तोडण्यासाठी उत्सुक होते.

Comments
Add Comment

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने