Gold Silver: स्वातंत्र्यदिनी सोने स्वस्त व चांदी महाग 'हे' आहे सविस्तर विश्लेषण

  47

मोहित सोमण: जागतिक सोन्यात आज घसरण झाल्याने भारतातल्या सराफा बाजारातही सोन्याची किंमत घसरली आहे. काल सोन्याच्या दरात कुठलाही बदल झाला नव्हता आज मात्र जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता कायम असल्याने स्वातंत्र्यदिनी दरपात ळी घसरली. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दरात १० रूपये,१८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०१२४ रूपये,२२ कॅरेटसाठी ९२८० रूपये,१८ कॅरेटसाठी ७५९३ रूपयांवर पोहोचली आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०० रू पयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८० रूपये घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०१२४० रूपये,२२ कॅरेटसाठी ९२८०० रूपये, १८ कॅरेटसाठी ७५९३० रूपये झाली आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सो न्याचे सरासरी दर २४ कॅरेट प्रति ग्रॅमसाठी १०१२४ रूपये,२२ कॅरेट प्रति ग्रॅमसाठी ९२८० रूपये,१८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमसाठी ७६७० रूपयांवर पोहोचले आहेत.

आज जागतिक निर्देशांकात अस्थिरतेचा फटका बसल्याने सकाळपासूनच सोन्यात घसरण झाली होती. याशिवाय सोन्याच्या प्रत्यक्ष व स्पॉट मागणीतही घसरण झाल्याने दरपातळी घसरली. परवा अमेरिकेतील शेअर बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला होता. त सेच युएस चीन सौद्यांमुळे वातावरण निवळले असले तरी पुन्हा आज पुतीन व ट्रम्प यांच्या बैठकीपूर्वी असलेल्या अस्थिरतेमुळे व आज दिवसभरात डॉलरच्या निर्देशांकात (Dollar Index DXY) मध्ये घसरण झाल्याने व युएस फेड व्याजकपातीची आशा असल्याने सोन्याच्या पातळीला आधार मिळाला नाही परिणामी बाजारात सोने घसरले आहे. याशिवाय, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,००,०२३ रुपयांवर घसरला, तर चांदीचा भाव प्रति किलो ११५१ ०० रुपयांवर घसरला आहे. सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत किरकोळ ०.०३% वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.०६% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजार आज बंद आहे मात्र काल एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.०१% वाढ झाल्याने सोने ९९८५०.०० रूपये प्रति तोळा दर पातळीवर स्थिरावले आहे.

सोन्यावर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रशिया-युक्रेन शांतता चर्चेसाठी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या अमेरिका-रशिया बैठकीची बाजारपेठेत सहभागी झालेल्या स हभागींकडून वाट पाहण्यात आल्याने कॉमेक्सवर सोन्याचा भाव $३,३५५ च्या जवळपास आणि एमसीएक्सवर १००२८० रुपयांवर घसरला, डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याला पाठिंबा मिळाला आहे, तर विविध देशांवरील चालू कर देखील त्याच्या बळकटीला आधार देत आहेत. एकूणच, जोपर्यंत ३,२८० डॉलरवर कायम आहे तोपर्यंत सोने सकारात्मक राहते. सोन्याची श्रेणी ९९००० ते १०१५०० रुपयांच्या दरम्यान दिसते.'

सलग दुसऱ्यांदा चांदीत वाढ !

एकीकडे सोन्यात घसरण होत असताना चांदीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ०.१० रूपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात १० रूपयांची किरकोळ वाढ झाली आहे.त्यामुळे चांदीचे प्रति ग्रॅम दर ११६.१० व प्रति किलो दर ११६१०० रुपयांवर गेले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सराफा बाजारात चांदीचे प्रति १० ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२६१ रूपये, प्रति किलोसाठी १२६१०० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील चांदी च्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत मात्र ०.५७% घसरण झाली आहे. सोन्याला पर्याय म्हणून चांदीकडे लोकांनी स्पॉट बुकिंग वाढवल्याने चांदी महागली होती मात्र डॉलरच्या निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे चांदी आजही नियंत्रित दरात वाढली आ हे. टॅरिफमधील अनिश्चिततेमुळे औद्योगिक मागणीत वाढ झाल्यानेही चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी मार्केटमध्ये एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात काल ०.०३% वाढ झाली होती.तसेच गुरुवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये सिल्व्हरच्या किमती १ १६ रुपयांनी वाढून ११४९१३ रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या कारण सहभागींनी त्यांचे दावे वाढवले.मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर,सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचे करार ११६ रुपये किंवा ०.१ टक्क्यांनी वाढून ११४९१३ रुपये प्रति किलोग्रॅम झाले आणि १४७५४ लॉटचा व्य वसाय झाला होता.

Comments
Add Comment

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि

Lay off: तीन दिवसात तीन कंपन्यांची कर्मचारी कपातीची घोषणा लवकरच 'या' कंपनीतही १२००० जणांच्या नोकऱ्या जाणार !

मोहित सोमण:आयटीतील एक चिंताजनक बातमी म्हणजे तीन दिवसात तीन कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. पहिले

सिनेमाचा निर्मिती खर्च ४०० कोटी, पहिल्या दिवशीची कमाई ५० कोटी, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यावर पडलं पाणी

मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा एकूण

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करणार

मुंबई : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा