मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग. कधी खड्डे तर कधी नियमावली असते. यावर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या कोकणकर चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा व्यत्यय न येता हा प्रवास सुखकर आणि सुखरूप व्हावा याकरिता वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. येत्या 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

गणेशभक्तांचा गावचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्या अनुषंगाने या महामार्गावर 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी असणार आहे.

येत्या 23 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत हे बंदीचे आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. शिवेंद्रसिंह राजे भोसले हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते म्हणाले कि, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग गणपती सनापूर्वी सुस्थितीत होणार असल्याची ग्वाही दिली.

 
Comments
Add Comment

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या