कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अधिक गतिमान, वेगवान होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पायाभूत, परिवहन सुविधांचा विस्तार व विकास सुरू आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) महत्वपूर्ण ठरत आहेत. वेगवान व सुरक्षित प्रवासाबरोबरच मुंबईकर नागरिकांना समुद्रकिनारी चालण्याची सोष उपलब्ध व्हावी म्हणून विहार क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. प्रशस्त पदपथ, हिरवल, सायकल ट्रॅक, तसेच दिव्यांगांसाठी व्हिलचेअर इत्यादी सुविधांयुक्त असलेला हा किनारीस रस्ता शुक्रवार मध्यरात्रीनंतर चाहतुकीसाठी २४ तास खुला केला जाणार आहे.


धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी चुमारी मार्ग यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते गुरुवारी १४ ऑगस्ट २०२५ दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. चद्रि (पूर्व) येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा पार पडला.


याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्यासह गहानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.


मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह बरोबरच आता मुंबईकरांना वरळी येथे सुंदर असे विहार क्षेत्र उपलब्ध झाले असून मुंबईकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुंबई किनारी रस्ता आता शुक्रवारी १५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर वाहतुकीसाठी २४ तास राहणार सुरू राहणार असल्याची त्यांनी घोषणा केली. सुंदर असा किनारी रस्ता २४ तास सुरू केल्यावर वाहनचालकांनी वाहतुकीचेच नियम पाळून चाहन चालवावे, मर्यादित वेगापेक्षा अधिकः वेगाने वाहने चालवू नयेत. आपला व इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.


Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर