हे सरकार हिंदू समाजानेच आणलं, दुसरे कोणी मतदान केलं नाही, मोहल्लात फिरलात पण मतदान झाले नाही, हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं,त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असल्याचं नितेश राणे म्हंटल. हर्णे बंदराचा विकास करण्यासाठी 250 कोटींचा निधी खर्च करणार असून हिंदू धर्माच्या दृष्टीने हिंदू म्हणून आपलं काम भक्कम असलं पाहिजे असंही राणे यांनी म्हटलं.
आज 14 हजार राख्या जमा केल्या, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. त्याचा परिणाम येत्या काळात आपल्याला दिसून येणार आहे. त्या निमित्ताने हिंदुत्व भक्कम होणार असल्याचं मंत्री नितेश राणे म्हटले. रत्नागिरीत असे अनेक प्रकरणे होत आहेत. याला एकच सक्षम उत्तर आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे.
" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत, किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडतो आहे ही राज्यातील महिलांची भावनाअसल्याचं मंत्री राणे यांनी म्हटलं.