Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम आहे. मुंबईच्या तुरळक भागांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. दिवसभरातही उत्तर मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा या पावसामुळे खोळंबा झाला, तर दक्षिण मुंबईत मात्र पावसाने हजेरी लावली नाही.


या आठवड्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात बुधवार, १३ ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर राज्यात १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ ऑगस्टला महामुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १४ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात दि. १३ आणि १४ ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

ब्लॅकमेल ऑपरेशन : जस्ट डायलद्वारे मसाज करायचंय, तर हे पहाच!

न्यूड व्हिडिओच्या धमकीने हायकोर्टाच्या वकिलाला ब्लॅकमेल करणारे भामटे गजाआड मुंबई : एका ६३ वर्षीय उच्च

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली

मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

धरणांमध्ये ९९.१३ टक्के पाणीसाठा मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये

शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगदा मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट

एसटी बस आगारांचा १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देणार!

परिवहन महामंडळाचे कुर्ला, बोरिवली, राज्यातील इतर शहरांमध्ये भूखंड मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या राज्यातील बस

लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आणखी एक चांगली बातमी...

दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार मुंबई : मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी