सय्यद किलेअर्क भागातील रहिवासी आहे. स्थानिक त्याला गुंड म्हणूनच ओळखतात. तुरुंगातून बाहेर आलेल्या सय्यदचे मैत्रीणीने हार घालून स्वागत केले होते, त्यामुळे त्याने मैत्रीणीवर रात्री अचानक भेटून गोळीबार का केला ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सय्यदवर बलात्कार, शस्त्रसाठा, ड्रग्स तस्करी, खुनाचा प्रयत्न, चोरी यासारखे पंधरा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. रात्री तो नशा करुन बेगमपुरात मैत्रीणीला भेटण्यासाठी आला. यावेळी सय्यद आणि त्याच्या मैत्रीणीचा वाद झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यानंतर सय्यदने मैत्रीणीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत सय्यद पळून गेला होता. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि लगेच तपास सुरू केला.