खेड येथील अपघाताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

  125

मुंबई: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला असून २२ महिला जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. दुपारी एकच्या सुमारास हा अपघाच झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्याचे निर्देश दिले. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत शासनाकडून केली जाणार असल्याची माहिती दिली.


पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे असल्याचा विश्वास, उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.

Comments
Add Comment

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, तर दोन्ही उपमुख्यमंत्री...

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ

मराठ्यांचा अभिमान उजळला! रघुजींचा वारसा सरकारच्या हाती

मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे

Pankaja Munde : "तुकड्यांचा मोह नको, स्वाभिमान जपा – मुंडेसाहेबांचा अमूल्य सल्ला"; पंकजा मुंडे झाल्या भावुक

लातूर : “मुंडेसाहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं. त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही

Pune Accident: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणारी पिकअप दरीत कोसळली, ६ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

खेड: पुण्यातील खेड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महिला

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक, शिवभक्तांचा उत्साह

ब्रह्मगिरी फेरीसाठी मोठी गर्दी नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या