‘दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीचा प्रथमच बेल्जियममध्ये दणाणणार जयघोष

गणेशोत्सवात प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द


पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषासह ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती की जय…’चे स्वर आता थेट बेल्जियममध्ये निनादणार आहेत. महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियममध्ये दरवर्षी साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मूर्तीचे पुण्यातील मंदिरात विधीवत पूजन करून नुकतीच ती महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली. उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे उपस्थित होते.


गणरायाची अडीच फूट उंचीची ही प्रतिकृती पुण्यातील सुभाषनगर येथील श्री नटराज आर्ट्सचे भालचंद्र ऊर्फ लाला देशमुख आणि राजेंद्र देशमुख यांनी साकारली आहे. ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांच्यासह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्वीकारली. १७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून यानिमित्ताने बेल्जियममधील भारतीयांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. शिरीष वाघमारे म्हणाले, ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीचे बेल्जियममध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमसाठी अभिमानाचा क्षण आहे.



‘आता विश्वात्मके देवे’ची येणार प्रचिती


गणरायाची बेल्जियममधील स्थापना ही आमच्यासाठी श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरणार असल्याचे सांगत महेश सूर्यवंशी पुढे म्हणाले की, ‘गणरायाची मूर्ती बेल्जियममध्ये जात असल्याने ‘आता विश्वात्मके देवे’, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पसायदानामधील श्लोक हा खऱ्या अर्थाने साध्य होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. बेल्जियममधील गणेशभक्तांची अपार श्रद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर असल्याने गणरायाची मूर्ती त्यांना देण्यात आली आहे. जवळपास अडीच हजार मराठी बांधव त्या ठिकाणी सक्रिय आहेत. तसेच २० ते २५ हजार भारतीय नागरिक उत्सवात सहभागी होतात. लोकमान्य टिळकांची समाज एकसंध होण्याची भावना, भारतासह परदेशातदेखील घडत आहे, याचा आनंद आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८