भारतात ओप्पोची नवीन सिरीज के13 टर्बो 5जी ११ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई: स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा खळबळ माजवण्यासाठी ओप्पो सज्ज झाले आहे. कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित के-सिरीजमधील नवीन स्मार्टफोन, ओप्पो के13 टर्बो 5जी भारतात लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२५ रोजी ही सिरीज भारतीय ग्राहकांसाठी सादर होणार असून, तिचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात देण्यात आलेली इनबिल्ट कूलिंग फॅन टेक्नॉलॉजी. भारतीय स्मार्टफोनमध्ये प्रथमच वापरल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे दीर्घकाळ गेमिंग किंवा हेवी वापरातही फोन थंड राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ओप्पोच्या नव्या के13 टर्बो सिरीजमध्ये दोन मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत. ओप्पो के13 टर्बो 5जी मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 प्रोसेसर, Mali G720 MC7 GPU, 16 GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1 TB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज असेल. तर अधिक शक्तिशाली ओप्पो के13 टर्बो प्रो 5जी मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर, 16 GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1 TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स आणखी वेगवान होईल.

डिझाइनच्या बाबतीतही ओप्पोने नेहमीप्रमाणेच विशेष लक्ष दिले आहे. के13 टर्बो प्रो मध्ये ‘टर्बो ब्रीदिंग लाइट’ नावाचे विशेष फिचर असेल. यात कॅमेऱ्याच्या बाजूला दोन ‘मिस्ट शॅडो LEDs’ आणि आठ रंगांची RGB लायटिंग दिली जाईल, ज्यामुळे गेमिंगचा अनुभव अधिक रोमांचक होईल. या मॉडेलमध्ये सिल्व्हर नाइट, पर्पल फँटम आणि मिडनाइट मॅव्हरिक हे रंगसंगतीचे पर्याय असतील.

तर के13 टर्बो मॉडेलमध्ये ‘टर्बो ल्युमिनस रिंग’ असेल, जी नैसर्गिक किंवा UV प्रकाशात चार्ज झाल्यावर अंधारात मंद प्रकाश उत्सर्जित करेल. यात व्हाइट नाइट, पर्पल फँटम आणि मिडनाइट मॅव्हरिक हे रंग उपलब्ध असतील.

हे स्मार्टफोन्स चीनमध्ये आधीच लाँच झाले आहेत आणि त्याच्या आधारे भारतातील किंमतींचा अंदाज वर्तवला जात आहे. ओप्पो के 13 टर्बो 5जीची किंमत सुमारे 21,500 पासून सुरू होऊन 27,500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर ओप्पो के13 टर्बो प्रो 5जी ची सुरुवातीची किंमत 24,000 असू शकते आणि टॉप व्हेरिएंट 32,500 पर्यंत जाऊ शकतो. मात्र, या किंमती अंदाजित असून अधिकृत किंमत जाहीर होण्यासाठी ११ ऑगस्टची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भारतीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि उच्च परफॉर्मन्सची मेजवानी देणारी ही नवी के13 टर्बो 5जी सिरीज स्मार्टफोन बाजारात नवी स्पर्धा निर्माण करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती