सरपंच-उपसरपंचांना मानधन दुप्पट करण्याचा निर्णय

  39

ग्रा. पं. सदस्यांची अवघ्या २०० रुपयांवर बोळवण


मुंबई : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच-उपसरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूर्वीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती; परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेली अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसून त्यांची केवळ २०० रुपये बैठक भत्त्यावर बोळवण केली जात आहे.


सरपंच-उपसरपंचांवर मेहेरबान, मग आमच्यावरच अवकृपा का? असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासन सरपंच व उपसरपंच यांच्याप्रमाणेच गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्यदेखील कामकाज करत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानपूर्वक मानधन मिळायला पाहिजे. यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे; परंतु त्याची अद्यापही दखल घेतली नाही.


त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना केवळ २०० रुपये बैठक भत्त्यावर समाधान मानावे लागत आहे. शासनाने सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले, त्याला कोणत्याही सदस्यांनी विरोध न करता या निर्णयाचे स्वागतच केले. परंतु शासनाने ग्रामपंचायत सदस्यांचा विचार करून मानधनात वाढ करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी
केली आहे.



ग्रामपंचायतींचे सुधारित मानधन


ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे तेथील सरपंचाचे मानधन रु. ३००० वरुन रु. ६००० तर उपसरंपचाचे मानधन १००० रुपयांवरुन २००० रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० ते ८००० पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. ४००० वरुन रु. ८००० तर उपसरपंचाचे मानधन १५०० वरुन रु. ३००० करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८००० पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन ५००० रु. वरुन १०,००० रु. तर उपसरपंचाचे मानधन २००० रुपये वरुन ४००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात
आलेला आहे.

Comments
Add Comment

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना ‘राष्ट्रपती भवन’चे आवतण

पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या अवलियाच्या कामाची दखल जुन्नर : पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलेले जुन्नरचे

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने