महाविद्यालयाने अधिक शुल्क घेतल्यास कारवाई होणार

  26

शुल्क नियामक प्राधिकरणाचा महाविद्यालयांना इशारा


मुंबई : विद्यार्थ्यांकडून एकापेक्षा अधिक वर्षांचे शुल्क घेऊ नये, असे शुल्क वसूल केल्याची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयावर कठोर कारवाईचा इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील सर्व वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधि आणि कृषी अभ्यासक्रमाच्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना दिला आहे. जर संस्थांनी एका वर्षापेक्षा जादा शुल्क घेतले तर त्याबाबतची तक्रार पुराव्यासह प्राधिकरणाच्या fra.govmh@gmail.com या ई-मेलवर करावी, असे आवाहन प्राधिकरणाने विद्यार्थी व पालक यांना केले आहे.


महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घ्यावे, किती वर्षांचे घ्यावे याचा उल्लेख करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली, तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी घ्यावयाचे शुल्क निश्चित केलेले असते. तरीही, अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे अशा तक्रारी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे येत आहेत.


अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा अधिक वसूल केलेले शुल्क हे कॅपीटेशन फी असल्याचे समजले जाईल आणि अशा संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश निश्चिती झाल्यास प्राधिकरणाने ठरवलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेण्यात यावी. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही अनामत रक्कम परत करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे, अशा सूचना प्राधिकरणाने सर्व वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधि आणि कृषी अभ्यासक्रम महाविद्यालयांच्या प्रशासनाला केली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर

लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि आता अपात्र जाहीर झालेल्या २६ लाख जणींची चौकशी होणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वर्षभरापासून एक कोटी पेक्षा जास्त

सोमवारपासून अतिमुसळधार

मुंबई : पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा

म. वैतरणा जलाशयावरील १०० मेगावॉट वीजनिर्मितीला गती

प्रकल्पाला सरकारची मंजुरी मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर २०

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पात सात वर्षांपूर्वी बांधलेला पुलाचा अडसर

या पुलाच्या बांधकामासाठी खर्च केलेला २७ कोटींचा पैसा जाणार वाया मुंबई : मुंबई महानगरपालिकेने तब्बल सात

सलीम पिस्टलला नेपाळमध्ये अटक

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख ऊर्फ सलीम पिस्टल याला