भारतावर ५०% टॅरिफ लादल्याप्रकरणी पुतिन ट्रम्प यांच्या भेटीची तारीख ठरली! काय होणार चर्चा?

भेटीचे ठिकाण आणि तारीख ठरली, ट्रम्प यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत दिली माहिती


नवी दिल्ली: भारत रशियाकडून कच्चे तेल विकत घेत असल्याची पोटदुखी डोनाल्ड ट्रम्प यांना आहे.याच पार्श्वभूमीवरअमेरिकेकडून भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. ज्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका प्रश्नाला उत्तर देताना भारतासोबतच्या व्यापार संबंध तोपर्यंत पुढे जाणार नाहीत, जोपर्यंत हा विषय निकाली लागणार नाही, असे म्हटले होते. दरम्यान भारताने ट्रम्प यांचा हट्ट अद्याप पूर्ण केलेला नसून, अमेरिकेसमोर भारत साकार झुकलेलं नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र करवाढीची चिंता भारताला सतावत असल्या कारणामुळे, भारताच्या बाजूने रशिया अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणार आहे.


ट्रम्प यांच्या भारतावर ५० टक्के कर वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात, भारताच्या बाजूने काही देशही उभे असल्याचे बघायला मिळतंय. आता त्यामध्येच मोठा घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे ष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट होणार आहे. या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.



ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष


डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषणा केली की, ते १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतील. या भेटीबद्दलची पोस्ट त्यांनी थेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने भारतावर आवाजावी कर लादल्यानंतर, पुतिन भारतातदेखील येणार असल्याची बातमी समोर येत आहे.



भेटीमध्ये विविध विषयांवर होणार चर्चा


या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊ शकते. जसे कि, युक्रेन आणि रशिया युद्ध बंद करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत. याचदरम्यान भारतावर लावण्यात आलेल्या कराबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा

जीएसटी दर कपातीत सुमारे ३७५ वस्तू होणार स्वस्त

मुंबई : जीएसटी दर कपातीनंतर आता स्वयंपाकघरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवसापासून अर्थात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत आहे. यामुळे

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज करणार महत्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण

अमूलने ७०० हून अधिक उत्पादनांचे दर कमी केले, २२ सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू

नवी दिल्ली: अमूल (Amul) या लोकप्रिय ब्रँडची मार्केटिंग करणारी कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF)