गंगोत्रीला गेलेल्या कुटुंबाशी संपर्क तुटला!

  17

नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण


विरार : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री धाम येथील एका गावाजवळ ५ ऑगस्ट रोजी भीषण ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच ठिकाणी गंगोत्री धाम येथे देवदर्शनासाठी गेलेल्या विरार पूर्व येथील एकाच कुटुंबातील सात जणांचा तीन दिवसांपासून संपर्क होत नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री धाम या ठिकाणी लाखो भाविक देवदर्शनासाठी जात असतात. गंगोत्री धाम आणि मुखाच्या जवळ धराली गाव असलेले आहे. गंगोत्री येथे जाणाऱ्या अनेक यात्रेकरूंचा याच गावात मुक्काम असतो. ५ ऑगस्ट रोजी या गावच्या वरच्या बाजूस खीर गंगा पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली. या घटनेत धरालीच्या बाजारपेठेतील हॉटेल्स आणि दुकाने पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे बंगल्याप्रमाणे कोसळली आणि संपूर्ण बाजारपेठ पुरात वाहून गेली. लष्कराच्या दहा जवानांसह अनेक नागरिकही या घटनेनंतर बेपत्ता आहेत. दरम्यान, विरार पूर्व येथील कोटकर कुटुंब गंगोत्री धाम या ठिकाणी दर्शनासाठी गेले आहे. ३१ जुलै उत्तराखंड येथे गेलेले कोटकर कुटुंबीय १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे परत येणार होते. मात्र धराली गावाजवळ घडलेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर या कुटुंबासोबत त्यांच्या नातेवाइकांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे कोटकर यांचे विरार येथील नातेवाईक विजय दशपुते यांनी या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली आहे आणि आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गंगोत्री धाम येथे अडकलेल्यांमध्ये दीपक कोटकर ५३, शुभांगी कोटकर ४८, शौनक कोटकर २४, शर्विल कोटकर २०, सुरेश येवले ५२, अनिकेत येवले २५ आणि नयना येवले ४४ यांचा समावेश आहे.




उत्तराखंड येथे देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबीयांबाबत माहिती मिळाली आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला या संदर्भात माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून कोटकर कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- विवेकानंद कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.


Comments
Add Comment

मोखाडा नगरपंचायत रिक्त पदे; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ मोखाडा : मोखाडा नगरपंचायत ही आता रिक्त पदांची पंचायत झाल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिकेत पुन्हा ११५ नगरसेवक बसणार

प्रभाग रचना प्रारूप आराखडा शासनाकडे सादर प्रभागांची २९ संख्याही कायम विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी

चार उड्डाणपुलांच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

निधी मागणीसाठी 'एमएमआरडीए'कडे प्रस्ताव विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात

वसई-विरार भागातील चार उड्डाणपुलाच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या

भाजपमधील ‘इनकमिंग’ वाढणार

पालिकेच्या सत्तेसाठी वसई-विरारमध्ये मोर्चेबांधणी विरार : वसई आणि नालासोपारा बहुजन विकास आघाडीचे हे दोन्ही गड

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या