निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

  144

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयोगाने ३३४ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. निवडणूक प्रणालीतील शुद्धीकरणाचा हा एक भाग असल्याचे आयोगाने म्हटले आहे.



काय आहेत नियम?


निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी प्रत्येक सहा वर्षांतून किमान एकदा तरी निवडणूक लढवणे अनिवार्य आहे. याशिवाय, पक्षाच्या कोणत्याही बदलाची माहिती आयोगाला देणेही बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या पक्षांवर ही कारवाई करण्यात आली आहे.



जून महिन्यात आयोगाने ३४५ पक्षांच्या नियमांचे पालन तपासण्यासाठी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या तपासणीत ३३४ पक्षांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. उर्वरित काही प्रकरणे पुढील पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहेत.


या कारवाईनंतर आता देशात एकूण ६ राष्ट्रीय, ६७ राज्यस्तरीय आणि २,५२० नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेले राजकीय पक्ष अस्तित्वात राहतील.

Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी