Wednesday, February 11, 2026

Rakhi : रक्षाबंधनासाठी २१ हजार कोटींचे मार्केट सज्ज!

Rakhi : रक्षाबंधनासाठी २१ हजार कोटींचे मार्केट सज्ज!

राखी, मिठाई, फळे, गिफ्टमधून कोट्यवधींची उलाढाल

रक्षाबंधनाच्या आगमनाने देशभरातील बाजारपेठा रंगीबेरंगी आणि गजबजलेल्या झाल्या आहेत. फक्त राख्याच नव्हे, तर मिठाई, चॉकलेट, ड्रायफ्रूट्स, गिफ्ट्स आणि डेकोरेशन साहित्याची खरेदीही भरभराटीत सुरू आहे. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अंदाजानुसार, यंदा देशभरात सुमारे १७००० कोटींचा राखी व्यापार होणार असून मिठाई, फळे, गिफ्ट व इतर पूरक खरेदीतून आणखी ४००० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण २१००० कोटींचा आर्थिक बूस्ट भारतीय बाजारपेठेला मिळणार आहे.

?si=gKqPTvTiDsrNq5Xn

यंदा राख्यांमध्ये इनोव्हेशनचा विशेष प्रभाव दिसतोय ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेपासून डिजिटल राखी, मोदी राखी, आत्मनिर्भर भारत, जयहिंद, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा राष्ट्रभक्तीपर थीम्सना भरघोस मागणी आहे. त्याचबरोबर इको-फ्रेंडली राख्यांचा ट्रेंड जोर धरत असून माती, बीज, खादी, बांबू, कापूस यापासून बनवलेल्या राख्या खरेदीदारांच्या पसंतीस उतरत आहेत. या राख्या फक्त सुंदरच नव्हे तर पर्यावरणपूरकतेचा संदेशही देतात. कस्टमाइज्ड राख्यांचीही क्रेझ वाढली आहे. भाऊ–बहिणीचे फोटो, नावे किंवा खास मेसेज कोरलेल्या राख्या लोकप्रिय होत आहेत.

देशभरातील विविध भागांतून खास राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत छत्तीसगडची कोसा राखी, कोलकात्याची जूट राखी, मुंबईची रेशमी राखी, नागपूरची खादी राखी, जयपूरची सांगानेरी राखी, पुण्याची बीज राखी, झारखंडची बांस राखी,आसामची चहा पत्ती राखी आणि बिहारची मधुबनी राखी सणाला अनोखी ओळख देत आहेत. अशा या वैविध्यपूर्ण खरेदीमुळे रक्षाबंधन हा फक्त भावंडांचा सण न राहता, परंपरा, नवकल्पना आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचा संगम बनला आहे. बाजारपेठांतील ही उत्साही गडबड सणाच्या आनंदाला आणि अर्थव्यवस्थेलाही नवीन उजाळा देते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >