Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र आता न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत कबुतरखाना बंदच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कबुतरप्रेमींसाठी ही मोठी निराशा ठरली आहे, तर दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य मानला जात आहे. या प्रकरणात पुढील टप्प्यावर काय घडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






“आरोग्य अधिक महत्त्वाचं”; कबुतरखान्यावर बंदी कायम


दादरमधील कबुतरखान्याच्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपला स्पष्ट निर्णय दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेला कबुतरखान्यावर बंदीचा आदेश कायम ठेवत सांगितलं की, “नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” यासोबतच कोर्टाने स्पष्ट इशारा दिला की, या आदेशाचा कोणीही अवमान करू नये. जर कोणा पक्षकाराला निकालावर हरकत असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. "आमच्या निर्णयाचा अवमान न करता, न्यायालयीन पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा," असं ठामपणे न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालामुळे आता कबुतरखान्याच्या विरोधात असलेल्यांना दिलासा मिळाला आहे, तर समर्थकांच्या नाराजीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.




आता सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होणार?


मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता या आदेशाविरोधात पुढची पायरी सर्वोच्च न्यायालयात नेली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांना दाणापाणी देण्यास पुन्हा परवानगी मिळावी, यासाठी कबुतरखाना सुरू ठेवण्याचे समर्थक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता पुढील लढाई उच्च न्यायालयातून थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या