विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस


घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले; विशेषाधिकार समितीचा कठोर निर्णय


मुंबई : विधान परिषदेची प्रतिष्ठा मलीन करणे आणि घटनात्मक पदांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अहिल्यानगरमधील शरद पवार पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना महागात पडले आहे. विधान परिषद विशेषाधिकार समितीने मोरे यांना ३० दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी या संदर्भातील १६७ पानांचा अहवाल मंगळवारी सभागृहात सादर केला.


दि. २३ नोव्हेंबर २०२५ या दिवशी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या भाषणात सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद, सभागृहाची रचना, कायदेनिर्मिती प्रक्रिया आणि सभापती यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. दि. ९ डिसेंबर २०२५ या दिवशी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. समितीने ६ बैठका घेऊन या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला.


समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की, सूर्यकांत मोरे यांनी केलेले कृत्य केवळ सभागृहाचा अवमान नाही, तर या सभागृहात पूर्वी कामकाज केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांसारख्या महान विभूती आणि संविधान यांचाही हा अप्रत्यक्ष अवमान आहे. अशा कृत्यांमुळे जनमानसाचा घटनात्मक संस्थांवरील विश्वास उडू शकतो. भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा कोणाकडूनही घडू नये आणि समाजात एक जरब बसावी, या हेतूने समितीने ही शिक्षा सुचवली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार अशा प्रकरणात २ वर्षांपर्यंतच्या कारावासाचे प्रावधान असले, तरी समितीने ३० दिवसांच्या शिक्षेची शिफारस केली आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर