Gurugram Crime : रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून! "कॅबची वाट पाहत असताना मॉडेलवर 'तो' घुटमळत होता… पुढे काय घडलं, वाचून हादराल!"

गुरुग्राम : गुरुग्राममधील राजीव चौक परिसरात अत्यंत वर्दळीच्या एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. एका मॉडेल तरुणीच्या समोरच एका तरुणाने रस्त्यावर हस्तमैथून करत अत्यंत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी त्या वेळी कॅबची वाट पाहत होती. त्याचवेळी तिच्याजवळ आलेल्या तरुणाने अश्लील चाळे सुरू केले. सुरुवातीला तिने हे दुर्लक्षित केलं, परंतु जेव्हा त्या तरुणाचे वर्तन मर्यादेपलीकडे जाऊ लागले, तेव्हा तिने धाडस दाखवत संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये शूट केला. यानंतर या मॉडेलने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी अशा विकृतीविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे.




अश्लील चाळे करणारा तरुण व्हिडिओत कैद


ही घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास दिल्ली-जयपूर हायवेवरील राजीव चौक परिसरात घडली. संबंधित तरुणी जयपूरवरून एका कामानिमित्त गुरुग्राममध्ये परतली होती आणि तिने बसमधून उतरून कॅबसाठी वाट पाहत असताना तिच्यासमोर एक तरुण अश्लील चाळे करताना दिसला. सुरुवातीला तरुणीकडून दुर्लक्ष केलं गेलं, मात्र जेव्हा त्या व्यक्तीचं वर्तन अत्यंत घृणास्पद आणि अस्वस्थ करणाऱ्या पातळीवर गेलं, तेव्हा तिने त्याचा व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये शूट केला. त्या तरुणाने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता, खांद्यावर बॅग होती आणि पँटची चैन उघडून तो अश्लील कृती करत होता. या घटनेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी तिने केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.




पोलिसांकडून आणि हेल्पलाइनवरूनही मदतीचा अभाव


या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना पीडित मॉडेल तरुणीने आपला संताप व्यक्त केला. व्हिडिओमध्ये ती स्पष्टपणे सांगताना दिसते की, संशयित तरुण बऱ्याच वेळेपासून तिच्या आजूबाजूला घुटमळत होता, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. त्याच्या घाणेरड्या वागणुकीमुळे ती अत्यंत संतप्त झाली होती. तिने तातडीने कॅब ड्रायव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने फोन उचलला नाही. परिणामी, स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने दुसरी कॅब बुक केली आणि तेथून सुरक्षितपणे घराकडे रवाना झाली. घरी पोहोचल्यानंतर, तिने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ गुरुग्राम पोलीस, विविध शासकीय खात्यांचे सोशल मीडिया हँडल्स आणि महिला हेल्पलाइनच्या X (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर शेअर केला. मात्र, तिच्या तक्रारीकडे कुठूनही लक्ष देण्यात आलं नाही. इतकंच नव्हे तर, तिने महिला हेल्पलाइन क्रमांक १०९० वर कॉल केला असतानाही कॉल कनेक्ट झाला नाही, अशी तक्रारही तिने केली आहे.




ऑनलाइन तक्रार नाकारल्याने मॉडेलचा संताप


गुरुग्राममध्ये अश्लील वर्तनाचा बळी ठरलेल्या मॉडेल तरुणीने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने सकाळी ११ वाजता राजीव चौक येथे घडलेल्या घटनेबाबत पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला ऑनलाईन तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही, थेट पोलीस ठाण्यात यावं लागेल, असं सांगण्यात आलं. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणीने सोशल मीडियावर आपली खदखद व्यक्त करत विचारलं की, “जर माझ्यासोबत मोठा अनर्थ घडला असता, तर मग काय झालं असतं? फक्त तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्येच जावं लागणार का?” तिने यावरही प्रश्न उपस्थित केला की अशा गंभीर तक्रारी ऑनलाईन स्वीकारल्या जात नाहीत, हे ऐकून तिला धक्का बसला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुरुग्राम पोलीस निरीक्षक संदीप कुमार यांनी सांगितले की, संबंधित घटनेची पोलिसांना माहिती मिळालेली असून, लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल. आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना