Go Back To India...', आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर हल्ला

नवी दिल्ली: आयर्लंडच्या वॉटरफोर्ड शहरात ६ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर एका किशोरवयीन टोळीने वर्णद्वेषी हल्ला केला. "गो बॅक टू इंडिया" असे म्हणत सायकलने तिच्या गुप्तांगावर मारले आणि तिच्या चेहऱ्यावर ठोसे मारले गेले. ती मुलगी भीतीमुळे हादरली आहे. तिच्या नर्स आईने तक्रार दाखल केली आहे, पण शिक्षेची नव्हे, तर समुपदेशनाची मागणी केली आहे.


संध्याकाळी घराबाहेर खेळत असताना काही मुलांनी तिला "गो बॅक टू इंडिया" असे म्हणत घेरले आणि तिला मारहाण केली. आरोप आहे की, त्यांनी सायकलने तिच्या गुप्तांगावर मारले आणि तिच्या चेहऱ्यावर अनेक ठोसे मारले. घटनेच्या वेळी मुलीची आई आपल्या १० महिन्यांच्या मुलाला दूध पाजण्यासाठी घरात गेली होती. त्यांनी सांगितले की, त्या बाहेर लक्ष ठेवून होत्या, पण जेव्हा छोटा मुलगा रडू लागला, तेव्हा त्या एका मिनिटासाठी आत गेल्या. त्याचवेळी मुलगी रडत घरी परतली आणि काहीच बोलू शकली नाही.


नंतर तिच्या एका मैत्रिणीने सांगितले की, सुमारे १२ ते १४ वर्षांच्या पाच मुलांनी तिच्या चेहऱ्यावर ठोसे मारले आणि एका मुलाने सायकलचे चाक तिच्या गुप्तांगावर मारले. 8 वर्षांची एक मुलगीही या टोळीचा भाग होती.


मुलीची आई, जी पेशाने नर्स आहे आणि गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे, नुकतीच आयरिश नागरिक बनली आहे. त्यांनी सांगितले, "आम्हाला आता येथे सुरक्षित वाटत नाही. माझी मुलगी आता घराबाहेर खेळायला घाबरते. मला खूप दुःख होत आहे की, मी तिला सुरक्षित ठेवू शकले नाही. हे कुटुंब या वर्षी जानेवारीमध्ये वॉटरफोर्डच्या किलबॅरी भागात स्थलांतरित झाले होते.



आयर्लंडमध्ये भारतीयांवर आतापर्यंत तीन हल्ले झाले


मुलीच्या आईने घटनेची तक्रार गर्दा (आयरिश पोलीस) कडे केली आहे पण कोणत्याही शिक्षेची मागणी केलेली नाही. त्यांचे म्हणणे आहे, "मला वाटते की त्यांना समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन दिले जावे. आम्ही येथे व्यावसायिक आहोत, आम्ही आयर्लंडमध्ये काम करण्यासाठी खूप मेहनत केली आहे." या घटनेने आयर्लंडमधील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढवली आहे. गेल्या महिन्यात डब्लिनच्या एका उपनगरात एका ४० वर्षीय भारतीय व्यक्तीलाही किशोरवयीन टोळीने मारहाण केली आणि सार्वजनिकरित्या नग्न केले होते. १९ जुलैनंतर डब्लिनमध्ये भारतीयांवर तीन हल्ले समोर आले आहेत.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील