बदलापूरकरांवर पाणीकपातीचे संकट

बदलापूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेअगोदर दाखल झाल्याने पाणीटंचाईचा सामना बदलापूरकरांना करावा लागणार नाही, असे वाटले होते. मात्र यावर्षी तर ऐन पावसाळ्यात ‘पाण्याचीही आठवडा सुट्टी’ होणार आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पत्रक काढून जाहीर केले आहे.


बदलापूर शहरात महावितरणाचा वेळीअवेळी होणाऱ्या विजेच्या लपंडावाचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ पाणीपुरवठा योजना १०० वर्षे जुनी असून अजूनही ती कार्यरत आहे. त्यातच शहरात महानगर गॅस, एमआयडीसी, सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही, महावितरणचे आणि इतर कामांसाठी रस्ता खोदताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन कधी कधी फुटत असतात, त्यामुळे कुठे तरी पाणी गळती होतच असते. तसेच गेल्या वर्षभरात १००० नवीन पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत.


तसेच अजून ५०० नवीन कनेक्शन प्रस्तावित आहेत. त्यासाठी जवळजवळ २.५ द.ल.लि. पाणी अतिरिक्त लागत आहे. तसेच नवीन योजना अजून सुरू झालेली नाही. यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी पाऊस पडल्याने बडोदा एक्सप्रेस मार्गाची माती पहिल्याच पावसात पाइपमध्ये जाऊन कार्यक्षमता कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोज २०% पर्यंत पाणीपुरवठा कमी होत असल्याने टाक्यांची क्षमता ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाही. परिणामी, वेळेच्या नियोजनामुळे कमी दाबात पाणी सोडण्यात येते. पावसामुळे पाण्याच्या गढूळतेचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे दिवसातून किमान ३ ते ४ वेळा ट्रिपिंग होत असल्याने पंपिंग बंद होऊन याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.


पाटबंधारे विभागाकडून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना १४० एमएलडी इतका पाण्याचा कोटा २०२७ पर्यंत आहे. बडोदा मार्गाची माती पाइपमध्ये गेल्याने प्रत्यक्षात १२० एमएलडी पाणी वापरात येते.


म्हणजे एका शहराला ६० एमएलडी पाणी वापरता येते, असे जरी गृहीत धरले तरी, विविध कामांमुळे रस्ते खोदताना किवा इतर काही कारणामुळे पाइपलाइन कुठे ना कुठे फुटत असल्याने बदलापूर शहराला प्रत्यक्ष ५० एमएलडी पाणी सद्यस्थितीत मिळत आहे. अतिरिक्त २.५ एमएलडी पाणी देण्यास यंत्रणेवर ताण येत आहे. हे टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस त्या त्या भागात पाणीकपात तर उरलेल्या ८०% भागाला योग्य पाणीपुरवठा करता येईल.


हे नियोजन अंबरनाथमध्ये सुरू असून बदलापूर शहरासाठी देखील असेच नियोजन केल्यास कमीत कमी ८०% भागांना आठवड्यातून किमान ६ दिवस तरी सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. सध्या चाचणी स्वरूपात साधारणतः २ आठवडे पाणीपुरवठा कपात करण्याचे प्रस्तावित असून गरज पडल्यास हा कालावधी वाढू शकतो असे मजीप्रा बदलापूरचे उपविभागीय अधिकारी सुरेश खाद्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्या ४० जणांना नोटीस

भाईंदर : धूळ नियंत्रण, बांधकाम सुरक्षेविषयी उपाययोजनांचे पालन न करता इमारतीचे बांधकाम करणाऱ्या शहरातील ४०

रेल्वे स्थानकावर भीक मागणाऱ्या मुलीचा शारीरिक सुखासाठी वापर अन् खाडीत आढळला मृतदेह! डोंबिवलीतील धक्कादायक घटना उघड

ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये तीन दिवसांपूर्वी एका

खाडीत सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपीचा शोध सुरु

कल्याण : कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीळ रोडलगतच्या देसाई खाडीत एका सुटकेसमधून तरुणीचा

कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा स्व. आनंद दिघे उड्डाणपूल बंद

कडोंमपाकडून पुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामास सुरुवात कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने

ठाण्यात तस्कराला बेड्या; पाच कोटींचे चरस पकडले

ठाणे: पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनवर

ठाण्यात हिवाळ्यात उष्म्याचा कहर! तापमान ३५° अंशाच्या पुढे

उष्मा आगामी दोन-तीन दिवसांत आणखी वाढण्याचे संकेत ठाणे : जोमदार पावसामुळे यंदाच्या हिवाळ्यात आल्हाददायक गारवा