पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

  64

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. रक्षाबंधन काही दिवसांवर आले असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना येरवडा येथील लक्ष्मी नगर परिसरात घडली, जिथे भरधाव वेगात आलेल्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.


नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव अजिंक्य राजू गायकवाड (वय २२) असून, त्याची जखमी बहीण अनुष्का गायकवाड आहे. सोमवारी सकाळी अजिंक्य आपल्या बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होता. पुणे-सेंड मिरज कॉलेजजवळ नो-पार्किंगमधून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला.


या अपघातात अजिंक्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अनुष्कालाही गंभीर दुखापत झाली असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे.


अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अजिंक्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रक्षाबंधनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

विधवा पेन्शन योजनेची रक्कम ५००० रुपये करा

खासदार रविंद्र वायकर यांनी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे व सचिव यांना पाठवले पत्र मुंबई : राज्यातील