बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे : हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी शिवसेनेत प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने बेळगावात शिवसेना पक्ष वाढीला चालना मिळणार आहे.

पुरषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुवेल शेट्टे महाराज, मयुर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात महाराज, दिपा फडणवीस महाराज, अरविंद शिरळाकर महाराज, दादा महाराज, अजय घराडे महाराज यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असे ते म्हणाले. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता, मात्र आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. साधुसंतांचे आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा