महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

  35

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत महा मुंबई मेट्रोने आपल्या वेगवान यशाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

४ ऑगस्ट २०२५ – ही तारीख महा मुंबई मेट्रोसाठी केवळ एक आकड्यांची भर नाही, तर एक साक्ष आहे मुंबईकरांच्या विश्वासाची, त्यांच्या रोजच्या प्रवासात मेट्रोने दिलेल्या सोयीची आणि या महानगराच्या धकाधकीला दिलेल्या स्मार्ट पर्यायाची.

२ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेली दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो लाईन २अ) आणि दहिसर ते गुंदवली (लाईन ७) ही सेवा आता मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. या दोन मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या केवळ दररोजच्या गर्दीत नाही, तर आकड्यांच्या बाबतीतही विक्रमी ठरली आहे.




पहिल्याच दिवशी १९ हजारांहून अधिक प्रवासी मेट्रोतून प्रवास करत होते. तेच आज २० कोटींवर पोहोचले आहेत. अवघ्या ९ महिन्यांत १ कोटी, २५ महिन्यांत १० कोटी, ३३ महिन्यांत १५ कोटी आणि आता ३९ महिन्यांत २० कोटी प्रवासी! हा प्रवास आकड्यांचा नाही, तर मुंबईच्या वेगाचा आणि विश्वासाचा आहे.

हे यश सहज शक्य झालेलं नाही. संपूर्ण मेट्रो टीमच्या अथक प्रयत्नांमुळे, व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीमुळे आणि अर्थातच, मुंबईकरांच्या अपार प्रेमामुळे हे शक्य झालं आहे. विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत, नोकरदारांपासून ते प्रवासप्रेमींपर्यंत – प्रत्येकाने मेट्रोला आपलंसं केलं.

ही केवळ वाहतूक नाही; ही आहे एका शहराला त्याच्या भविष्याच्या दिशेने नेणारी चळवळ. मेट्रोने मुंबईला वेळ दिला, श्वास दिला आणि गर्दीच्या कुशीतून स्वच्छंदपणे पुढं जाण्याचा आत्मविश्वास दिला.




विशेष म्हणजे दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो लाईन २ अ) आणि दहिसर ते गुंदवली (मेट्रो लाईन ७) सेवेत दाखल होऊन फक्त ३९ महिन्यातच हा ऐतिहासिक पल्ला आम्हाला गाठता आला. मुंबईकरांनो, तुमच्या अफाट प्रेम आणि विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार. आमच्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हा यश मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन, असे मेट्रोने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो लाईन २अ) आणि दहिसर ते गुंदवली (मेट्रो लाईन ७) या मार्गिका सेवेत दाखल होऊन केवळ ३९ महिन्यांतच हा विक्रम गाठण्यात आम्हाला यश मिळालं.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी कार्यान्वित झाला. २ एप्रिल २०२२ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत या मार्गिकेवरुन २० कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला.

हा विक्रम केवळ आकडेवारीचा नाही, तर मुंबईच्या मेट्रो क्रांतीचा वेगवान प्रवास आहे. मुंबईच्या गतीला व स्वप्नांना पंख देणारा आणि मुंबईला 'भविष्यासाठी सज्ज' करणारा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.

रोज कामावर जाणाऱ्यांपासून, कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, महा मुंबई मेट्रोने मुंबईला एकत्र पुढे नेलंय. कामावर जाण्याची घाई असो, मुंबईत येण्याचा आनंद असो किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा क्षण असो, महा मुंबई मेट्रो प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे. प्रत्येक कथा वेगळी, पण तेवढीच खास.

मुंबईकरांनो, तुमच्यासोबतचा हा आनंददायी प्रवास यापुढेही अखंडपणे सुरुच राहील. तुमच्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार, असे म्हणत मेट्रोने मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या