Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवद्वारे ठार केल्यानंतर, त्यांच्याकडील काही महत्वाचे कागदपत्र भारताच्या हाती लागले आहेत. या कागदपत्रांनुसार ते पाकिस्तानी असल्याचा आणि पाकिस्तान लष्कराशी संबंधीत असल्याचे पुरावे सैन्याला मिळाले आहेत. याद्वारे पहलगाम हल्ल्याची योजना पाकिस्तानातच रचली गेली होती, आणि याचा संबंध थेट लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी सरकारी एजन्सींसोबत असल्याचे आता उघड झाले आहे.


पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. या हल्ल्याच्या तपासात भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या ३ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात भारतीय सैन्यांना यश आले खरे, पण याबरोबरच ते नेमके कुठून आणि कसे आले? याचा सुगावा देखील सैन्यांना लागला आहे.



तपासात काय उघड झाले?


पहलगाम हल्ल्यात सामील तीन दहशतवादी सुलैमान शाह उर्फ फैझल जट्ट, अबू हमजा उर्फ अफगान आणि यासिर उर्फ जिब्रान पाकिस्तान नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच ते लष्कर-ए-तोयबाचे A++ आणि A कॅटगरीचे कमांडर होते. भारतीय गुप्तचर एजन्सीच्या मते हे तिघंही मे २०२२ मध्ये गुरेज सेक्टरमधून एलओसी पार करुन कश्मीर खोऱ्यात दाखल झाले होते. त्यांचे रेडिओ सिग्नल त्याचवेळी इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतू नंतर हे दहशतवादी पहलगाम जवळी एका झोपडीत लपून बसले. येथे स्थानिक मदतगार परवेझ आणि बशीर अहमद जठार यांनी त्यांना शरण दिली होती.



पाकिस्तान नागरिक असलेले महत्वाचे कागदपत्र आणि साहित्य


ऑपरेशन महादेव अंतर्गत या तिघांना २८ जुलै रोजी भारतीय सैन्यांनी ठार करत मोठे यश मिळवले. यादरम्यान त्यांच्या जवळून काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यातील दोन दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी व्होटर आयडी कार्ड सापडले असून ते लाहोर आणि गुजरांवाला येथून जारी केलेले आहेत. या शिवाय त्यांच्याकडे एका सॅटेलाईट फोनमधून मायक्रो-एसडी कार्ड मिळाले आहे, त्यात NADRA चा बॉयोमेट्रीक डेटा सापडला. या डेटातून या अतिरेक्यांचे नागरिकत्व, कसूर जिल्हा, पीओके येथील कायमस्वरुपी पत्त्याची माहिती मिळाली आहे. तसेच फोरेन्सिक तपासानंतर हे देखील स्पष्ट झाले आहे की हल्ल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या त्याच AK-103 रायफलच्या  आहे, तसेच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानात तयार झालेले चॉकलेट आणि इतर खाण्या पिण्याचे सामान सापडले आहे, ज्यावर २०२४ चे मुझफ्फराबाद येथे पाठवले गेलेल्या शिपमेंटच्या लॉटचे नंबर होते.



मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकमध्ये शहिदांसारखा मानसन्मान


दरम्यान एक आणखी महत्वाची माहीती मिळाली आहे की लष्करच्या लाहोर स्थित ऑपरेशन चीफ साजिद सैफुल्लाह जट्ट या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे. तर रावळकोट निवासी रिझवान अनीस याने कश्मीरात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी गायबाना नमाज-ए-जनाजा आयोजित केला होता. थोडक्यात काय तर पाकिस्तानात या दहशतवाद्यांना शहिदांसारखा मानसन्मान मिळाला.


गृहमंत्री अमित शाह यांनी देखील संसदेत सांगितले की आमच्याकडे आता पहिल्यांदा पाकिस्तानकडून जारी केलेले सरकारी दस्तावेज आहेत. ज्यामुळे स्पष्ट होते की पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी पाकिस्तानी होते. हा डोजिएर आतापर्यंतचा सर्वात ठोस आणि निर्णायक दस्तावेज मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची अतिरेक्यांना पाठींबा देण्याची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात