काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या महिला खासदार सुधा रामकृष्णन यांनी केली. ही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

खासदार सुधा रामकृष्णन तामिळनाडू भवनमध्ये राहतात. तामिळनाडूतील मयिलादुथुराई येथील खासदार रामकृष्णन यांनी सांगितले की, चाणक्यपुरी येथील पोलिश दूतावासाजवळ त्या द्रमुकच्या त्यांच्या सहकारी खासदार राजथी यांच्यासोबत फिरत असताना सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणात खासदार सुधा रामकृष्णन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. स्कूटरवरून येणाऱ्या एका व्यक्तीने सोनसाखळी खेचली आणि वेगाने निघून गेला असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी पोलिसांना तसेच पत्राद्वारे अमित शाह यांना सांगितले आहे. चोरट्याने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नसल्याची माहिती खासदार सुधा रामकृष्णन यांनी दिली. चोरीची घटना सकाळी ६:१५ च्या सुमारास घडली. चोरटा विरुद्ध दिशेने त्यांच्या जवळ आला आणि सोनसाखळी चोरुन पळून गेला, असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी सांगितले.

चोरटा आमच्या दिशेने शांतपणे आला त्यामुळे त्याचा उद्देश चोर करणे हाच आहे, हे लक्षात आले नव्हते; असे खासदार सुधा रामकृष्णन म्हणाल्या. चोरट्याने सोनसाखळी जोरात खेचली, यामुळे मानेला दुखापत झाली आणि चुडीदार फाटला असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी सांगितले.
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान