अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच ठरेल. आज ब्लूमबर्गने छापलेला अदानी समुहासंबंधित अहवाल कंपनीने फेटाळले ज्यात अदानी समुह चायनीज कंपनी बीवायडी (B YD) व बिजिंग वेलिअन (Beijing Welion) यांच्याशी भारतात बॅटरी उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी बोलणी सुरु केली असे म्हटले होते. तसेच आम्ही कुठल्याही प्रकारच्या अशा बोलणीत गुंतलेलो नसल्याचे समुहाने स्पष्टपणे नमूद केले आहे.

या अहवालातील माहितीवर अदानी समुहाने स्पष्टपणे नाराजी प्रकट करत म्हटले आहे की,'अदानी ग्रुप आणि चिनी कंपन्या BYD आणि बीजिंग वेलियन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी यांच्यात करार झाल्याचे सूचित करणारा ब्लूमबर्गचा ४ ऑगस्ट २०२५ रोजीचा अहवाल  आम्ही स्पष्टपणे नाकारतो. हा अहवाल निराधार, चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.' असे अदानी एंटरप्रायझेसने स्पष्ट केले आहे. आज छापलेल्या कथित अहवालात अदानी समुह चीनी कंपनीशी हातमिळवणी करत बॅटरी उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची शक्यता असून स्वच्छ उर्जा क्षेत्रासाठी नवी मोहिम हाती घेण्याची शक्यता आहे.

अदानी समूहाने पुढील पाच वर्षांत जवळजवळ १०० अब्ज डॉलर्सच्या भांडवली खर्चाच्या गुंतवणुकीची तयारी करत असल्याचे म्हटले होते. समूह थर्मल आणि नूतनीकरणक्षम उत्पादन,ट्रान्समिशन, वितरण, एलएनजी, एलपीजी, सीएनजी, पीएनजी, बॅटरी स्टोरेज, हायड्रोजन ट्रक,ईव्ही चार्जिंग स्टेशन, पंप्ड हायड्रो आणि खाणकाम यांचा समावेश असलेला सर्वात उच्च एकात्मिक ऊर्जा व्यवसाय (Integrated Energy Business) चालवतो. हा समूह भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि सर्वात कार्यक्षम सिमेंट उत्पादक आहे, तसेच एरोस्पेस आणि संरक्षण, डेटा सेंटर आणि रिअल इस्टेटमध्ये समुह कार्यरत असून भारतातील प्रमुख ३ श्रीमंत व्यवसायिकात गौतम अदानी यांचे नाव येते.
Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे