राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तब्बल ३० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तिला हा सन्मान मिळाल्यामुळे, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन तिने बाप्पांचा आशीर्वाद घेतला. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  राणी मुखर्जीचे हे फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.


सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोवर राणी मुखर्जीचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना दिसून येत आहेत.  राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने देबिका चॅटर्जीची भूमिका साकारली होती. राणीचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.





राणी मुखर्जीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटापासून झाली. त्यानंतर 'गुलाम', 'कुछ कुछ होता है', 'हम तुम', 'बंटी और बबली', 'कभी अलविदा ना कहना', 'तलाश' आणि 'हिचकी' असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने केले. राणी लवकरच 'मर्दानी ३' मध्ये दिसणार आहे. 

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला