Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल.


माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ११.०५ वाजेपासून ते १५.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३६ ते १५.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील ट्रेन माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे पलीकडे जाणाऱ्या जलद ट्रेन मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.


ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील ट्रेन मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जाऊन मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील व १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.१० वाजेपासून ते १६.१० वाजेपर्यंत ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३४ वाजल्यापासून १५.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील तसेच


पनवेल/बेलापूर/वाशी येथून १०.१६ वाजल्यापासून १५.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी मार्गांदरम्यान विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येतील.


ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना १०.०० वाजल्यापासून १८.०० वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.