मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे आयोजन केले आहे.
अशातच आता रेल्वेने श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना उकडीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-कोकण रेल्वेमार्गे प्रवास गोड करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळणार आहे. प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला वाव देण्यासाठी आणि प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.