रेव्ह पार्टी करणाऱ्या पतीसाठी कायपण! रोहिणी खडसेंची प्रांजल खेवलकरला वाचवण्यासाठी धडपड

  37

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली.त्यांच्या अटकेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड चर्चा पाहायला मिळाली. इतकेच नव्हे तर प्रांजल खेवलकर यांच्यावर अमली पदार्थ सोबत बाळगण्याबरोबरच इतरही काही थेट गंभीर आरोप करण्यात आले आहे. शिवाय या संदर्भातले ठोस पुरावे देखील सादर झाले असल्याकारणामुळे, खडसेंच्या जावयाचा पाय आणखीनच गाळात रुतत चालला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे प्रयत्न करत असून, आपल्या वकिली शिक्षणाच्या आधारे, प्रांजल खेवलकरच्या समर्थनार्थ शक्य ते प्रयत्न करीत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून, रोहिणी खडसे आताच शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.


पुण्यातील खराडी भागात प्रांजल खेवलकर आणि त्यांच्या साथीदारांची रेव्ह पार्टी सुरू होती, आणि रूम देखील खेवलकरांच्या नावानेच बुक करण्यात आली. या पार्टीतून पोलिसांना कोकेन आणि गांजा मिळालाय. यासोबतच दारूच्या देखील पोलिसांनी पार्टीतून जप्त केली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ देखील पुढे आले आहेत. सध्या रेव्ह पार्टी प्रकरणी सात जण कोठडीत असून त्यांना पुणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



रोहिणी खडसे यांनी घेतली शरद पवारांची भेट


पती प्रांजल खेवलकर हा न्यायालयीन कोठडीत असताना आता रोहिणी खडसे या थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. प्रांजल खेवलकरचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. हेच नाही तर कालच खेवलकरांच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला जाईल, असे बोलले जात होते.




एकनाथ खडसेंचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप


रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याकडून पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप करण्यात आले. पुणे पोलिसांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुणे पोलिस कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. यादरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील पुणे पोलिसांवर आरोप केली.




Comments
Add Comment

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’

बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे.

तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ! स्थानिक पुजाऱ्यांनी दिली माहिती

तुळजापूर:  तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाली आहे, असे

Pune Accident: पुण्यात खड्ड्याने घेतला वृद्धाचा जीव, यंत्रणेचा निष्काळजीपणा की हेल्मेटचा अभाव?

पुणे:  पुण्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ते

कोल्हापूरकरांच्या गेल्या ४० वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली माहिती, काय ते वाचा....

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे